आदेश न्यूज नेटवर्क
हिंजवडी पुणे.
हिंजवडी या ठिकाणी फेज थ्री या ठिकाणी चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंजवडी पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. आरोपी ऑनलाईन वेबसाईटवर जुगार खेळत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 29 जून रोजी रात्री साडेनऊ वाजता सुमारास मेघा पोलीस माय स्टिक येथील प्लॉट नंबर 1604 या ठिकाणी कारवाई केली. अनुराग आगरदास बंजारे धनंजय पाल संजय गजभिषे अमोल, राहुल मदनसिंग कुमार, अशी अटक केलेला आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार राजाराम गोकुळदास आरोटे यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर आयपीसी 420,464,465,468, सह महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे