आदेश न्यूज नेटवर्क
संत तुकाराम महाराजांचे पालखी अडविल्या प्रकरणी ग्रामस्थ कारवाई करण्यात आलेली आहे. सरपंच आणि उपसरपंच अनेक ग्रामस्थांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सरपंच अमित कांचन माजी सरपंच भाऊसाहेब कांचन अलंकार कांचन संतोष उर्फ पप्पू कांचन. प्रताप कांचन राजेंद्र कांचन यांच्यासह 20 पदाधिकारी व ग्रामस्थ वर पुण्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा उरुळी कांचन विसाव्या दरम्यान पालखी नियोजनावरून सोहळा चे विश्वस्ताने ग्रामस्थ यांच्यात वाद झाला होता. यावेळी सोहळ्यातील नगारा बैलगाडा आडविण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला होता. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.