आदेश न्यूज नेटवर्क गणेश विठ्ठल राऊत
यांना मानद डॉक्टरेट…
कोंढवे धावडे – ग्लोबल हुमन राईट्स ट्रस्ट विश्व मानवधिकार संस्थेच्या वतीने श्री.गणेश विठ्ठल राऊत यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली…
अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे दिव्यांग,अपंग, गरीब, सामान्य जनतेसाठी निस्वार्थ कार्य, आपल्या कुटुंबाचा विचार न करता अहोरात्र सामाजिक बांधिलकी जपत अनेकांसाठी मदत तसेच जीवाची पर्वा न करता करोना काळात केलेली निस्वार्थ सेवा या सर्व बाबींचा विचार करत सामजिक क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना ही पदवी डॉ. एच. आर. रेहमान चेअरमन व सेक्रेटरी परमजीत सिंग सेक्रेटरी यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली..
या वेळी आपल ध्येय आणि आपल अस्तित्व बनवत असताना…
आपण करत असलेल्या कामाच्या वेळी अनेकांनी कमी लेखलं पण कुणी चांगले म्हणो वा वाईट आपण आपल कार्य करत राहणे हे महत्वाचे आहे फळ मिळो न मिळो जर आपल काम प्रामाणिक असेल तर देवाला ही फळ द्यावेच लागत अस प्रामाणिक मत यावेळी गणेश राऊत यांनी व्यक्त करत उपस्थित सर्वांचे आभार मानले…