आदेश न्यूज नेटवर्क
पुणे .
महिला पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून या अधिकाऱ्याच्या जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे.
त्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. फरसखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर पोलीस कर्मचारी ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी करत होते. यावेळी वाहना चालकांकडून अडवून त्यांचे मद्य सेवन केले आहे की नाही ते तपासले जात होते. त्याचवेळी एका वाहन चालकाने महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडतात इतर पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेलं माहितीनुसार संजय फकीरा साळवे असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या पिंपरी चिंचवड मध्ये वास्तव्यास आहे. हा व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले त्यावेळी वाद झाला. संतापलेल्या आरोपीने महिला पोलीस अधिकारी वर पेट्रोल ओतले. व लाईटर ने पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने लायटर उलटा पकडला असल्याने आग लागली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात आला पोलीस सुरक्षित नाही त्यामुळे सामान्य जनतेचे काय होणार असा सवाल उपस्थित होत आहे. अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे अशी भावना सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.