दौंड तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीची संधी, नामदेव ताकवणे शरद पवार यांच्या हस्ते होणार नोकरी महोत्सवाचे उद्घाटन
दौंड तालुक्यातील वाढती बेरोजगारी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्रजी पवारगट ) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नामदेव ताकवणे यांनी युवकांसाठी नोकरी महोत्सव आयोजन दिनांक 21 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता चौफुला वरवंड येथील सिद्धी राज मंगल कार्यालय पुणे सोलापूर रोड येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, नोकरी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते ठीक 9 वाजता होणार आहे , 40 पेक्षा जास्त कंपन्यांचा यात सहभाग होणार आहे, तरी दौंड तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा, यामध्ये सहभागी असणाऱ्या कंपन्या सहजपूर, नांदूर, कुरकुंभ, बारामती, चाकण, या ठिकाणच्या कंपनीचा सहभाग आहे, दौंड तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना एक चांगली संधी आहे, यामध्ये दहावी, बारावी ,पदवीधारक, पदविका धारक, अभियांत्रिकी पदवी असलेले, सुशिक्षित बेरोजगार यात सहभागी होऊ शकतात, जास्तीत जास्त तरुणांनी नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा, आयोजक नामदेव ताकवणे