आदेश न्यूजनेटवर्क पुणे
(झाडे लावा झाडे जगवा
प्रदूषण टाळा)
दिनांक 21/ 7 /2024 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरणी वंदन करत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यवत ब्रिक्स मानव अधिकार संघटना तर्फे झाडे लावा झाडे जगवा अशी उपक्रम राबविण्यात आले. किमान एक व्यक्ती दोन झाडे तरी लावला पाहिजे. कारण या झाडामुळे प्रदूषण कमी होत असतो आजच्या सिमेंटच्या जंगलामध्ये जिथे पाहाल त्या ठिकाणी मोठी टॉवर्स, बिल्डिंग, उभा राहत आहेत. झाडांचं खुलेआम पण कत्तल होत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुद्धा झाडे लावण्याची आपल्याकडे परंपरा आहे. एक झाड किमान सात लोकांना ऑक्सिजन देऊ शकतो अशी प्रयोगशाळेने सिद्ध केला आहे. म्हणून प्रत्येकाने किमान एक झाड लावावे. त्यामुळे प्रदूषणाच्या विळख्यातून आपण वाचू शकतो. म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतर्फे गुरु पौर्णिमेच्या निमित्त साधून संघटनेच्या पुणे शहर पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहर दौंड तालुका शिरूर तालुका या ठिकाणी वरून सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन बोपदेव घाट या ठिकाणी झाडे लावण्यात आली. कारण आता सतत पाऊस पडत असल्यामुळे झाडे जगण्याची शक्यता दाट असते. म्हणून झाडे लावायचे उपक्रम हाती घेण्यात आली.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अकबर शिकलकर, महाराष्ट्र प्रदेश माहिती अधिकार अध्यक्ष श्री गणेश घाडगे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण विभाग संतोष शितोळे, जिल्हाध्यक्ष सचिन खंडागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल बोराडे, पुणे शहराध्यक्ष महेश शर्मा, शिरूर तालुका अध्यक्ष योगेश भोसले, शिरूर तालुका संघटक मारुती शिंदे दौंड तालुका उपाध्यक्ष अमोल शिंदे. पिंपरी चिंचवड शहर संघटक ज्ञानेश्वर देवरे, पर्वती मतदार संघ अध्यक्ष विक्की चंदनशिवे पुणे शहर संघटक अमोल पाटोळे, पुणे जिल्हा वाहतूक विभाग अध्यक्ष अमर जगताप व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाडे लावण्याचा कार्यक्रम साजरी केली.