आदेश न्यूज नेटवर्क पुणे
125000रूचे 24 दुचाकी हस्तगत.
पुणे शहरामध्ये वाहन चोरीच्या प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत होते. याबाबत मा पोलीस आयुक्त साहेबांनी सर्व पोलीस स्टेशनला कारवाई
करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच मा अर राजा, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांनी देखील हडपसर पोलीस ठाणे येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाहन चोरीच्या गुन्ह्याबाबत सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेलं सूचनेप्रमाणे संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, यांनी तपास पथक अधिकारी/अंमलदार यांचे मीटिंग घेऊन वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी आराखडा तयार केला. त्यानुसार तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कवळे, पोलीस उपनिरीक्षक पोलिस अंमलदार दीपक कांबळे, चंद्रकांत रेजीतवाड ,अजित मदने, कुंडलिक केसकर असे, पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरी प्रतिबंधक क पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार दीपक कांबळे आणि चंद्रकांत रेजीतवाड यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून, आरोपी नामे दीपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे, वय 30 राहणार थोरात वस्ती द्वारका मेडिकल समोर कोलवडी रोड मांजरी, पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मांजरी मुंडवा ,लोणी काळभोर, लोणीकंद, भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर यापूर्वी सुद्धा मोटर सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
आरोपी नामे दीपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे, थोरात वस्ती द्वारका मेडिकल समोर कोलवडी रोड मांजरी पुणे, याच्या मागील काय महिन्यापासून हडपसर तपास पथक शोध घेत होते. परंतु तो मिळून येत नव्हता. आरोपीचे ठाव ठिकाणाबाबत खात्रीला माहिती प्राप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीस हडपसर पोलीस ठाणे
गु र न 900/2024 भारतीय दंडविधी कलम 379 या गुन्ह्यात अटक करून त्यास न्यायालयासमोर उभा केला असता, कोर्टानी त्याची 5/9/2024 पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली.
आरोपीकडून आजपर्यंत 24 गुन्हे उघडकिस आणण्यात आली. किंमत 125000 रुपयाचे माल जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये 9 होंडा शाईन, 4 हिरो होंडा फॅशन,4 स्प्लेंडर 2 हिरो होंडा डिलक्स,2 एक्टिवा,1 होंडा डियो 1 होंडा ड्रीम युग, अशा 24 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नमूद दुचाकी या पुणे शहर धाराशिव आणि लातूर, या ठिकाणी वरून हस्तगत करण्यात आल्या आहेत. हडपसर पोलीस स्टेशन 19 मुंडवा पोलीस स्टेशन 2 लोणीकंद पोलीस स्टेशन 2 आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशन 1 असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदर कामगिरी ही मा श्री अमितेश कुमार पुणे पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, मा श्री मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त, मा श्री आर राजा, पोलीस उपायुक्त सौ परिमंडळ 5 यांच्या मार्गदर्शनाखाली मा अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे, मा श्री संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, निलेश जगदाळे पोलीस गुन्हे, यांच्या सूचनाप्रमाणे पोलीस तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिसांमधील दीपक कांबळे, चंद्रकांत रजेतवाड , सुनील राठोड, ज्योतिबा पवार, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, अतुल पंदरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलिक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजीत राऊत, यांच्या पथकाने प्रशांसनीय कामगिरी केली आहे