पुणे शहर नाहीतर संपूर्ण देशांमध्ये प्लास्टिक वर बंदी घातलेले आहे.
त्याचे कारण अशी आहे की त्या प्लास्टिक पिशवीमुळे कित्येक लोक त्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये घरामध्ये राहिलेलं शिळं अन्न टाकून रस्त्यावर फेकून देत असतात. आणि त्या अन्न खाण्यासाठी गुरे शेळ्या कुत्रे मांजरे असे नाना प्रकारचे प्राणी ते अन्न प्लास्टिक पिशवी सहित खात असतात. प्लास्टिक पिशवी खाल्ल्यामुळे प्राण्यांचे पोटामध्ये ते प्लास्टिक पिशवी पचन होत नाही. पचन न झालेला सर्व प्लास्टिक पिशव्या त्या प्राण्यांचे पोटामध्ये मोठा गट्टा तयार होतो त्यामुळे ते प्राणी आजारी पडून मृत्युमुखी होतो. दुसरी आणखीन एक बाब म्हणजे पावसाळ्यामध्ये मुंबई या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडल्यामुळे सर्व नाले ओवर फुल झाले होते. आणि प्रत्येक ठिकाणी पाणी जाण्याचे रस्त्यामध्ये प्लास्टिक पिशव्या अडकल्यामुळे पाणी जाण्यास रस्ता नव्हता. त्यामुळे पूर्ण मुंबई पाण्यामध्ये बुडाली होती हेही एक दुसरी बाजू आहे. या सर्व कारणामुळे प्लास्टिक आपल्या आरोग्य साठे हानिकारक आहे. म्हणून प्लास्टिक वर बंदी आणण्यात आली आहे. पण पुण्याच्या प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या मिळत आहेत .त्यांना कोणाचाही भीती नाही. ते खुलेआम प्लास्टिकपिशव्या विकत आहेत. प्लास्टिक पिशवीच्या विक्रीवर बंदी आणली आहे. पण कारवाईसाठी पुणे महानगरपालिका यांच्याकडे अधिकार आहे. पण महानगरपालिकेच्या अधिकारी वेळेवर हजर होत नसतात. कारण त्यांच्याआणि प्लास्टिक विक्रेत्यांच्या मध्ये साठा लोट झालेला असतो. म्हणून त्या अधिकारी वेळेवर हजर होत नाही अशी प्रत्येक वेळेस झाली आहे. अशीच एक दुकान सुखसागर नगर या ठिकाणी अंबिका या नावाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक विक्री होत आहे. आदेश न्यूज नेटवर्क चे टीमने त्या ठिकाणी प्लास्टिक पिशवी विकत घेऊन महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांना फोन केलेला होता. पण महानगरपालिकेच्या अधिकारी गणपती विसर्जनाचं नाव सांगून पळवाट काढला. महानगरपालिकेचे अधिकारी असे म्हणाले की साहेब आता गणपती विसर्जनचे दिवस आहेत. आम्हाला रात्रंदिवस झोप नाही. गणपती विसर्जन संपू दे त्यानंतर आपण कारवाई करूया. म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी काहीतरी पळवाट काढत नसतील ना. अशी मनामध्ये शंका येते. पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे काम आहे बंदी असलेले प्लास्टिक पिशव्या कुठलेही दुकान मध्ये विक्री करू नये आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी आदेश जनतेचे मागणी आहे.
प्लास्टिक पिशवीचे कारवाई करताना पहिला वेळ कारवाई केल्या तर 5000 रुपये दंड करण्यात येईल. दुसऱ्यांदा कारवाई झाली तर 10000 रुपये दंड आकारण्यात येईल. तिसऱ्यांदा कारवाई झाली तर 25000 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. पण अशी कारवाई होताना दिसत नाही आता तरी महानगरपालिका जागी होईल का ? आणि कारवाई करेल का ?वाट पाहावे लागेल.