दौंड तालुक्यातील यवत गावातील मुख्य चौकात असणारा राणी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातून पहाटे तीन वाजण्यास सुमारास दोन तरुणाने दुकानचे सेटर उचकटून दुकानात प्रवेश करत गल्ल्यातील रोख एक लाख रुपये व काही मोबाईल गेले असल्याच्या प्राथमिक माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विजय कोल्हे व पोलीस कर्मचारी शैलेश लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दुकानाचे चोरी होत असेल तर…वाड्या वस्त्यांमध्ये परिस्थिती गंभीर्यपूर्वक असल्याचे बोलले जात आहे.चोरी करणारे दोन्ही मुलं वयाने कमी व सडपातळ असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.याबाबत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी यावेळी सांगितले.तसेच व्यवसायिकांनी आपल्या दुकानाला सेंटर लॉक बसवणे आवश्यक आहे.तसेच सेटरचे अँगल जाड असले पाहिजे जेणेकरून ते वाकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच यापुढे असे घटना घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. व दुकानांमध्ये रोख रक्कम ठेवणे टाळले पाहिजे.आदेश न्यूज यवत