17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम च्या कार्यक्रमा दिनानिमित्त लातूर या ठिकाणी प्रणव श्री मंगल कार्यालय मध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आली होती यावेळी देशाच्या प्रत्येक राज्यांमधून कार्यकर्ते उपस्थित होते.
32 वर्ष पाकिस्तान जेलमध्ये काढलेले कुलदीप यादव यांच्या सत्कार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अकबर शिकलकर, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडागळे ,पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री संतोष शितोळे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. व तसेच पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, काश्मीर, दिल्ली, तेलंगणा, कर्नाटक या ठिकाणी वरून खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. हैदराबाद कर्नाटकाच्या तावडीतून मराठवाडा 17 सप्टेंबर रोजी मुक्त करण्यात आली होते. त्यामुळे प्रति वर्ष 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून सादर केली जात आहे. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभलं. मार्गदर्शनाच्या वेळी कार्यकर्त्यांना वेळोवेळी जनआंदोलन उभा करण्याचे व सामान्य व गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवायचे अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरुद्ध बुलंद आवाज उठवायची अशी व्याख्या करण्यात आली. तसेच लातूर या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी दारूबंदीच्या विरोधात जन आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलन मध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी सत्कार करण्यात आली. व तसेच संघटने वाढीसाठी संघटनेचे नाव मोठा करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेल्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अकबर शिकलकर पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडागळे महाराष्ट्र प्रदेश माहिती अधिकार अध्यक्ष श्री गणेश घाडगे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील, पुणे जिल्हा ग्रामीण विभाग अध्यक्ष श्री संतोष शितोळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आली. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रति वर्ष 17 सप्टेंबर दिवशी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. यावेळी सुद्धा 17 सप्टेंबर गणेश विसर्जन असल्या तरीसुद्धा कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते.