- *आदेश न्यूज नेटवर्क
घोडगंगा साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सभासदांचा आक्रोश… अशोक पवार चोर है च्या घोषणेने आसमंत दुमदुमले*
➖➖➖➖➖➖➖➖➖
आज न्हावरा येथे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्व साधारण सभा दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली होती . या सभेत सभासदांनी प्रचंड आक्रोश करत गोंधळ घातला *अशोक पवार चोर है , बाप लेक चोर है* अशा घोषणा देत सभासदांनी सभा निम्यातच बंद केली.
मागील २ वर्षापासुन घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असुन अशोक पवार यांच्या मेहुन्याचा व्यंकटेश कारखाना मात्र प्रचंड नफ्यात असल्याने घोडगंगा कारखान्याचा सभासदांनी आपली नाराजी व्यक्त केली.
आज पहिल्यांदाच सर्वसाधारण सभेत सभासदांच्या प्रचंड आक्रोशापुढे अशोक पवार एकटे पडल्याचे चित्र दिसत होते. आजच्या सभेत जमलेल्या सभासदांपैकी ८० ते ८५ टक्के सभासद अशोक पवारांच्या विरोधात गेलेले दिसले …