पुणे( मुख्य संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील )
सविस्तर वाचा:दोन जणांचा जीव घेतल्यानंतरही केवळ निबंध लिहायला सांगून त्याला बाल हक्क मंडळ ने जामीन दिलेला होता. या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विरोधाचा वातावरण होते. या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर आज बालहक मंडळाने अल्पवयीन आरोपीचे जामीन रद्द करताना त्याची रावानगी बालसुधारकग्रहात करण्याचे आदेश दिले. आरोपी वेदांत अग्रवाल याला आज बालहक्क न्यायमंडळ समोर हजर करण्यात आले. तसेच त्याच्यावर लादलेली गुन्ह्याची कलमाताहीं वाढ करण्यात आली. दारू पिऊन कार चालविले असल्याचे त्याच्यावर 185 कलमांतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयाला विनंती अर्ज केला आहे की हा गुन्हा गंभीर असल्याचे आरोपीवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याचे परवानगी द्यावी पोलिसांचा या अर्जावर कोर्टात सुनवणी झाली. मात्र आरोपी सज्ञान आहे की नाही हे पोलीस तपासण्यानंतर ठरविणार आहेत. व अल्पवयीन मुलाचा बिल्डर बाप विशाल अग्रवाल याला पुणे सत्र न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाकडून विशाल अग्रवाल यांच्या 7 दिवसांची पोलीस कोठडी मागणी करण्यात आली होती. अगरवाल यांनी अपघातानंतर कोण कोणाला फोन केले त्याचे छत्रपती संभाजी नगरला जाण्याचे कारण काय? त्याला तिथे कोणाला भेटायचं होते ? अशा आणि अन्य तपासणी साठी सात दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी पक्षाने पुणे सत्र न्यायालयाला केली. मात्र सत्र न्यायालयाने अग्रवालयाला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली.